बिद्रीच्या दूधसाखर पतसंस्थेत ३७ कोटीच्यावर ठेवी : बाबासाहेब पाटील
– ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार
बिद्री : ( व्हिजन प्रतिनिधी)
बिद्री येथील दूधसाखर पतसंस्थेचा कारभार पारदर्शी व सभासदाभिमुख करण्याचा आमच्या संचालक मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो. स्वर्गीय हिंदूराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श जपला असून संस्थेने विश्वासहर्ता निर्माण केली आहे. प्रत्येकवर्षी ठेवीमध्ये वाढ होत असून ३७ कोटीच्यावर ठेवीचा टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्षात १ कोटी २९ लाख ३७ हजार रुपये ठेवी जमा झाल्या असून ठेवीचा ओघ वाढत आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन व ‘बिद्री ‘ चे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधसाखर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ४६ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. या सभेत विषयपत्रिकेवरील आयत्या विषयासह सर्व दहा ही विषय सभासदांनी टाळयाच्या गजरात मंजूर केले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रारंभी स्वर्गीय हिंदूराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी जि. प. सदस्य भूषण पाटील यांनी प्रास्ताविक करून वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देत स्वागत केले.
चेअरमन श्री पाटील म्हणाले, चालू आर्थिक वर्षात संस्थेला १५ लाख ४५ हजार रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना ९ टक्के डिव्हिडंड देण्यात येणार आहे. संस्थेला ऑडिट वर्ग नेहमी प्रमाणे ‘अ’ वर्ग मिळाला आहे.
यावेळी सभासदांच्या पाल्यांनी इयत्ता दहावी व बारावीत यश मिळविल्याबद्दल रोख पारितोषिके देवून सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी अनुक्रमे – सिद्धी श्रीनिवास पाटील (वाळवे खुर्द), निलेश निवृत्ती बेलेकर (करडवाडी), अरुंधती अनिल पाटील (मल्लेवाडी). इयत्ता १२ वी- ऋत्वीका रणजीत चौगले (पनोरी), प्रज्ञा सतिश पाटील ( तिटवे), आदित्य जयवंत पाटील ( क ॥ वाळवे ).
यावेळी झालेल्या चर्चेत शिवाजी फराकटे, आर. डी. पाटील, रघुनाथ सूर्यवंशी, जयसिंग पाटील, केदारी पाटील, पांडुरंग डावरे, विष्णू कुंभार, बाळासो पाटील, सातापा तौंदकर, शहजी पाटील यांनी भाग घेतला.
संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव पाटील, संचालक नेताजी जठार, भूषण पाटील, महादेव पाटील, केरबा चौगले, पांडुरंग पाटील, सदाशिव भोपळे, भिमराव नलवडे, श्रीमती लिलावती पाटील, सौ. सुरेखा घाटगे यांच्यासह पांडुरंग संतराम पाटील, सुनिल वारके, माजी उपसरपंच भरत पाटील, प्रभाकर पाटील, माजी प्राचार्य जीवन साळोखे, आर. आर. किल्लेदार, महेश पाटील, टी. के. किल्लेदार, रामचंद्र यादव व सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अहवाल वाचन मॅनेजर पी. बी. कोंडेकर यांनी, तर नोटीस वाचन केशव वारके यांनी केले. आभार मोहनराव घाटगे यांनी मानले.
— ——————————————-
दूधसाखर म्हणजे एक परिवार !
दूधसाखर ही एक केवळ संस्था नसून दूधसाखर परिवार आहे. हा परिवार म्हणजे स्वर्गीय हिंदूराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श आहे. त्याद्वारे आपण एकमेकांना जोडलो गेलो आहोत. बदलत्या काळाने अनेकांनी दिशा बदलल्या पण आपला परिवार अजोड राहिला आहे. याचे समाधान आहे. मी व नव्या पिढीबरोबर भूषण पाटील ही काम करीत राहतील. असे भावोद्गार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त करीत भावी विकासात्मक योजना हाती घेतल्या असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
— ————————————————–