विविध वक्तृत्व स्पर्धेतसरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलचे यश
बिद्री : ( व्हिजन प्रतिनिधी)
गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व वाय.सी. एम. अभ्यास केंद्रच्या विद्यार्थ्यांनी तब्बल १३ पारितोषिके मिळवून यश संपादन केले.
विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेतील यश असे : हनुमान तालीम मंडळ,अर्जुनवाडा ता.राधानगरी- अनुष्का रवींद्र जाधव (प्रथम क्रमांक), संचिता संदीप गोजारे (तृतीय क्रमांक),
कै.आर. पी. ग्रुप व हुतात्मा शिवाजी चौक, नाधवडे ता.भुदरगड- अनुष्का रवींद्र जाधव (प्रथम क्रमांक), शिवतेज तरुण मंडळ कुडुत्री ता.राधानगरी- अनुष्का रवींद्र जाधव (द्वितीय क्रमांक), साक्षी तानाजी पाटील (चतुर्थ क्रमांक)
भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरी ता.गडहिंग्लज- संघर्ष भरत कांबळे (तृतीय क्रमांक), क्रांती अग्रणी जी.डी.बापू लाड वक्तृत्व स्पर्धा,कुंडल ता.पलूस जि.सांगली- संघर्ष भरत कांबळे (प्रथम क्रमांक), जय हनुमान व बा.वी.वडेर हायस्कूल, इस्पुर्ली ता.करवीर- अनुष्का रवींद्र जाधव (प्रथम क्रमांक), घाळी महाविद्यालय,गडहिंग्लज- संघर्ष भरत कांबळे (प्रथम क्रमांक), स्व. विजयसिंह डोंगळे वक्तृत्व स्पर्धा घोटवडे ता. राधानगरी-अनुष्का रवींद्र जाधव (द्वितीय क्रमांक), क्रांतिवीर संगोळी रायण्णा वक्तृत्व स्पर्धा कुर्ली ता. निपाणी- निहाल रवींद्र शिंदे (द्वितीय क्रमांक),सारथी निबंध स्पर्धा- वैष्णवी विजय मर्दाने (द्वितीय क्रमांक), स्व. विजयसिंह डोंगळे निबंध स्पर्धा घोटवडे ता. राधानगरी- प्रज्ञेश प्रदीप भोसले (द्वितीय क्रमांक)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व्याख्याते अतुल कुंभार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्व. विजयसिंह मोरे यांची प्रेरणा तर प्राचार्य विक्रमसिंह मोरे, उपप्राचार्य ए. बी. सावंत, पर्यवेक्षक एच. डी. पाटील व सर्व स्टाफचे प्रोत्साहन लाभले.
— —