बाचणीच्या साईनाथ तरुण मंडळाचा भक्तिमय वातावरणात श्री गणेश आगमन सोहळा
– महिलांचा टाळांचा तालमय गजर
कोल्हापूर : (व्हिजन प्रतिनिधी)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाच्या गजरात बाचणी (ता. कागल) येथील श्री साईनाथ तरुण मंडळाच्या श्री गणेशाचा आगमन सोहळा पार पडला. महिलांनी टाळांचा गजर व मुखामध्ये श्री हरिनाम करीत फेर धरीत मिरवणूकीत रंगत आणली.
प्राथमिक शाळेपासून मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला. टॅक्टर -ट्रॉलीवर भव्य गणेश मुर्ती, कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध फौज, महिलांचा गाळांचा गजर करीत लयदार पदन्यास, झिम्मा- फुगडीचा फेर धरीत पारंपारिक गीते सादर करण्यात आली. विठ्ठल-रखुमाईचा सजीव देखावा फिरवणूकीचे आकर्षण ठरले.
विठ्ठल रखुमाई प्राची संग्राम पाटील, स्वरा राहुल पाटील या मुलांनी साकारली होती. या मंडळाला ३८ वर्षे पूर्ण झाली असून प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबविले जातात.
आकर्षक मांडणी करण्यात आली असून श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना बाबुराव दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावर्षी मूर्तीचे देणगीदार श्रीकांत रघुनाथ पाटील आहेत. यावर्षी ही सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
— —