बोरवडेच्या शिवनेरी पत संस्थेत अडीच कोटीच्यावर ठेवी
– पत संस्थेच्या वार्षिक सभेत चेअरमन आनंदा फासके यांची माहिती
बिद्री : (व्हिजन प्रतिनिधी)
बोरवडे (ता. कागल) येथील शिवनेरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेला आर्थिक वर्षात २१ लाख ७४ हजार रूपयांचे भागभांडवल असून २ लाख ४२ हजार रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेकडे २ कोटी ५५ लाख १४ हजार रुपयांच्या ठेवी जमा आहेत. अशी माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन आनंदा फासके यांनी दिली.
शिवनेरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेपुढील सर्व विषय मंजूर होवून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष एम. आर. फराकटे यांच्या हस्ते करण्यात आले. नूतन चेअरमनपदी आनंदा फासके व व्हा. चेअरमन बाबुराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
चेअरमन फासके यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. संस्थेची आर्थिक उन्नती होण्यासाठी ठेवीमध्ये वाढ करण्यात येत असून सभासदांनी ही यासाठी योगदान द्यावे. सभासद ठेवीदार बाळासो रावू चौगले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत एम. आर. फराकटे, तुकाराम साठे, विलास गवाणकर यांनी भाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक चेअरमन व व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली.
यावेळी संचालक महादेव यादव, श्रीमती सारिका फराकटे, लक्ष्मण चौगले, शरद पाटील, संजय कुंभार, केरबा कांबळे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत कॅशिअर सौ. रेखा जाधव यांनी केले. सभेचे नोटीस वाचन मॅनेजर सौ. कोमल मोरे यांनी केले. अहवाल वाचन वसुली अधिकारी दिगंबर जाधव यांनी केले तर आभार टी. एम. सरदेसाई यांनी मानले.
— — — –