बीएलओ कामातून शिक्षकांना मुक्त करा
– जुनी पेन्शन संघटनेची कागल तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
बिद्री : प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २३ ऑगस्ट २०२४ रोजी शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत नव्याने एक शासन आदेश निर्गमित केला आहे. ज्यामध्ये शिक्षकांना अशैक्षणिक कामातून वगळणेबाबत सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज पेन्शन संघटना शाखा कागलच्या वतीने निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार अमरदिप वाकडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
बीएलओच्या कामातून शिक्षकांना मुक्त करणेबाबत तहसिलदार यांना विनंती करण्यात आली. याबाबत येत्या काही दिवसांत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन तहसिलदार वाकडे यांनी दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, सरचिटणीस चंद्रकांत शिरोळे, कोषाध्यक्ष व सर पिराजीराव पतसंस्थेचे संचालक विठ्ठल पाटील, संचालिका वैशाली कोंडेकर, कार्याध्यक्ष अमित सुर्वे, स्वप्निल सांगले, संदीप माने, संतोष इंगळे आदी उपस्थित होते.
— —