बिद्रीच्या दूधसाखर विद्यानिकेतनच्यावतीने ‘हर घर तिरंगा ‘ जनजागृती अभियान
मडिलगे : प्रतिनिधी
बिद्री (ता.कागल) येथील दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीदिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर बिद्री परिसरात हर घर तिरंगा जनजागृती अभियान राबविण्यात आले. या निमित्ताने भारत माता की…. जय, भारत देश हमारा – हर घर तिरंगा अशा घोषणा देत बिद्री परिसरात विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
यावेळी प्राचार्य एस. के. खांबे यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय राष्ट्रध्वजाचे महत्व विषद केले. उपमुख्याध्यापक पी. के .गुरव यांनी ९ ऑगस्ट क्रांतीदिन ते १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन हा सप्ताह हर घर तिरंगा अभियानाद्वारे प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहीती दिली. शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षक आणि विद्यार्थ्यानी व्यसनमुक्ती शपथ घेतली.
सभासमारंभ प्रमुख एस. एस.पाटील आणि सर्व शिक्षक यांनी संयोजन केले. यावेळी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.उपप्राचार्य एच डी तिराळे यांनी आभार मानले.
— –