आणि… विद्यार्थी सापाचे मित्रच बनले !
– बिद्रीच्या दूधसाखर विद्यानिकेतनमध्ये सर्पज्ञान कार्यशाळा
मडिलगे : प्रतिनिधी (सुनील खोत)
अबब…. केवढा मोठा साप…. असे ओरडून घाबरणारी शाळकरी मुले…. कांही वेळातच सापाला सराईतपणे हाताळू लागली जनू काय ते सापाचे मित्रच बनले.
बिद्री (ता.कागल) येथील दूधसाखर विद्यानिकेतन प्रशालेत नागपंचमी निमित्त ‘साप वाचवा – निसर्ग वाचवा ‘ उपक्रमांतर्गत सर्पमित्र सयाजी चौगले यांनी सापांचे निसर्गातील महत्व सांगून कार्यशाळा पार पडली
श्री. चौगले म्हणाले , सरपटणाऱ्या प्रजाती मधिल साप हा प्राणी मानवाचा शत्रू नसून खरा मित्र आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे काम साप करतात. अनेक विषारी व बिन विषारी सापांची ओळख त्यांनी केली. नाग, घोणस, धामण, पान दिवड, कवड्या, तस्कर अशा विविध जातींच्या सापांचे प्रत्यक्ष दर्शन घडवत त्यांनी सर्प विश्व उलघडले. सापां बद्दल चे समज – गैर समज, अंधश्रद्धा यांची माहीती दिली. विद्यार्थ्यानी सर्पदंशांनंतर चे प्रथमोपचार, त्याची लस कोठे मिळते. आदी माहिती जाणून घेतली .
यावेळी स्वागत व प्रास्ताविक सभा समारंभ प्रमुख एस् .एस् . पाटील यांनी केले. प्राचार्य एस.के. खांबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्याध्यापक पी. के . गुरव, पर्यवेक्षक डी . टी . कांबळे यांच्यासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
—-