- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : समितीवर राधानगरी तालुक्यातील प्रतिनिधींची नियुक्ती न केल्यामुळे असंतोष
सरवडे : (व्हिजन प्रतिनिधी : युवराज पाटील)
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समितीवर राधानगरी तालुक्यातील एकाही व्यक्तीची समितीवर नियुक्ती करण्यात आलेले नाही. हा मुद्दा सध्या चर्चेचा ठरला असून राधानगरी तालुक्यातील महायुती आघाडी कार्यकर्त्यांत असंतोष पसरला आहे.
राधानगरी विधानसभा मतदार संघ हा राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्याचा संयुक्त मतदार संघ आहे. लाडकी बहिण योजनेच्या समितीचे आमदार प्रकाश आबिटकर अध्यक्ष आहेत. तर भुदरगड तालुक्यातील दोघांना समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे राधानगरी तालुक्यावर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांत आहे. यामुळे नाराजी पसरली आहे.
यामुळे या शासकीय योजनांची अंमल बजावनी करताना मर्यादा आल्या आहेत. नागरिकांना न्याय मिळण्यासाठी संधी मिळणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासन व आमदारांकडे न्याय मिळवण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणावर तातडीने लक्ष देऊन राधानगरी तालुक्यातील प्रतिनिधींची समितीत नियुक्ती करणे आवश्यक आहे. ज्यामुळे स्थानिक समस्यांचे निराकरण सोपे होईल आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल.
— –