कागलच्या एस.टी. बसस्थानक व परिसरातील खड्डे त्वरीत दुरुस्तीसाठी ठाकरे शिवसेनेच्यावतीने आंदोलन
कागल : ( व्हिजन प्रतिनिधी)
कागलच्या एस.टी. बसस्थानक व शहर परिसरात मोठ मोठे खड्डे पडून पावसाळयात याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा. लागत आहे. प्रशासनाने हे खड्डे त्वरीत न मुजविल्यास कागल तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने तिव्र आंदोलन उभा रण्यात येईल. असा इशारा
उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी दिला.
कागल बसस्थानक व परिसर खड्डेमय झाला आहे. या निषेधार्थ आज उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी त्यांनी कागल परिसरामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचून या पाण्याचा त्रास अनेक एस. टी. बसस्थानक व परीसरांमध्ये येणाऱ्या, जाणाऱ्या सर्व नागरिकांना होतो .
काही दिवसांपूर्वी या परिसरातील खड्डे मुजवून परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ज्या ठेकेदाराने हे काम केले त्यांच्यावर योग्य कारवाई करून त्यांना काळ्या यादी टाकावे. हे खड्डे मुजवून नगरपालिकेने लोकांना चांगली सुविधा द्यावी.
अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभा करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला . यावेळी जय भवानी जय शिवाजी , निष्क्रिय प्रशासनाचा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, वाहतूक सेना शहर प्रमुख महाळूकरी कट्टी , शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष नितीश डावरे , रामदास पाटील, बाळासाहेब पाटील , वैभव मोडेकर आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
— –