शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस कागल तालुका शिवसेनेच्यावतीने साजरा
कागल : (व्हिजन प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसकागल तालुका शिवसेनेच्यावतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम व उपक्रम साजरे करण्यात आले.
यावेळी कागल येथे दैवत श्री साईबाबा यांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर एस. टी. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. बसस्थानक परिसरात मोफत दूध वाटप व कागल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. वाढदिवसानिमित्त विविध गावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे,तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेना शहर प्रमुख महाळूकरी कट्टी , वाहतूक सेना कागल तालुका अध्यक्ष नितीश डावरे. याच बरोबर रामदास पाटील, वैभव मोडेकर , श्री सावंत, बाळासाहेब पाटील. आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— —