कोल्हापूर : प्रतिनिधी
संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कोल्हापूरात पंचगंगेच्या महापुराचे पाणी विविध भागात शिरले आहे. पाणी शिरलेल्या भागांची पाहणी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शुक्रवार दि. २६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत केली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात महापूर परिस्थितीची आढावा बैठकही घेतली. पंचगंगा नदी धोक्याची पातळीकडे वाटचाल करीत असून पूर परिस्थितीबाबत दक्ष राहण्याची सूचना केल्या.
— –