दूधसाखर महाविद्यालयात यावर्षीपासून एम.एस्सी. अँनॅलेटिकल केमिस्ट्री विषयास मान्यता
– राज्य शासन व विद्यापीठाची मान्यता ; परिसरात समाधान
बिद्री : (प्रतिनिधी)
बिद्री येथील दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळाच्या दूधसाखर महाविद्यालयास चालू शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पासून एम.एस्सी. अँनॅलेटिकल केमिस्ट्री या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी दिली.
गेली 35 वर्षे शिवाजी विद्यापीठ संलग्नित दूधसाखर महाविद्यालय कला व विज्ञान शाखा मधून गुणवत्तापूर्ण पदवी शिक्षण देत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालयात नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चार तालुक्यातील सभासद व विद्यार्थी वर्गातून केमिस्ट्री या विषयाची पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सातत्याने मागणी होत होती .संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार के. पी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देता येईल असा एम.स्सी . केमिस्ट्री चा हा अभ्यासक्रम सुरू करणेसाठीचा परवानगीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता.त्यास शासनाची मान्यता मिळाल्याने परिसरातील पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याच महाविद्यालयातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन व उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. शिवाय बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पैसा व वेळ वाचणार आहे .या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या कामी संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार के. पी.पाटील, उपाध्यक्ष मा. गणपतराव फराक्टे ,सचिव सर्जेराव किल्लेदार ,सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.डॉ. आर. आर.पोवार , अधीक्षक एस. के. पाटील,सागर पाटील,रणजित पाटील ,संजय गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.
—