- राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूडला रविवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
बिद्री : प्रतिनिधी
शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त रविवार दि.21 रोजी मुरगूड विद्यालय, मुरगूड चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल प्रणित श्री छत्रपती शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या वतीने या भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. गेल्या 25 वर्षापासून या चित्रकला स्पर्धा होत आहेत.
स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे हे सहकार कृषी, कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात अभ्यासू व जाणते नेतृत्व होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 25 वर्षांपूर्वी कागल केंद्रावर या चित्रकला स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. मुलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने सुरू केलेल्या या चित्रकला स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ही चित्रकला स्पर्धा कागल, मुरगुड, कापशी व कणेरी अशा चार केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये पाच हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. एकूण सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. त्यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे चार गट तसेच मूकबधिर मुलांसाठी स्वतंत्र व मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. अत्यंत पारदर्शीपणे व निपक्षपातीपणी ही स्पर्धा होते. तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण केले जाते व निकाल काढण्यात येतो. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तसेच पहिल्या तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ बक्षीस देऊन विजेत्यांना सन्मानित केले जाते. या निमित्ताने बाल चित्रकारांना एक व्यासपीठ मिळणार आहे.