कागलच्या दूधगंगा विद्यालयाची वारकरी दिंडी म्हणजे धार्मिक एकतेचे प्रतिक
– दिडींला १७ वर्षाची अखंड परंपरा
कागल : (व्हिजन प्रतिनिधी)
कागल येथील दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल, या शाळेने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेने गेली १७ वर्षे दिंडीची परंपरा जपली आहे.सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत जणू वैष्णवांचा मेळा भरतो. येथील दिंडी म्हणजे धार्मिक एकतेचे प्रतिक मानले जाते.
दूधगंगा विद्यालयाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीत दिंडी फक्त शालेय विद्यार्थ्यांची न होता ती अबालवृद्धांच्या सहभागाने चैत्यन्य निर्माण होते. यावेळी निघालेल्या पालखी सोहळा अवर्णीय होतो. विद्यार्थी-विद्यार्थीनी पारंपारिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भक्तीमय गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. त्याच बरोबर स्वामी समर्थ वि. मं कागल, श्री रामलिंग बालविकास मंदिर कागल, स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल व दूधगंगा विद्यालय सहभागी होते. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा, सजिव देखावा तसेच समाज प्रबोधनपर व व्यसनमुक्तीवर आधारित फलक आकर्षक ठरले. दिंडीत दत्त भजनी मंडळ दावणे गल्ली, हनुमान भजनी मंडळ शाहूनगर व रामलिंग भजनी मंडळ काळम्मावाडी वसाहत कागल ही भजनी मंडळे सहभागी झाली होती.
विविध सामाजिक संस्था ,अनेक मंडळे, पालक, माजी विद्यार्थी यांचेवतीने लाडू, केळी दूध व पाणी याचे वाटप केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दिंडीच्या शेवटी राहून कचरा गोळा करून समाजभान जपले.
यावेळी कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे विश्वस्त अमेय जोशी, प्रतिष्ठित नागरिक आनंदराव पाटील, गौतम गाडेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे, शिवाजी दावणे, अकबर नायकवडी, कागल पोलीस ठाण्याचे कर्मचारी व पालक यांची उपस्थितीत होते.
वारकरी दिंडीचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.
— —