आषाढी एकादशी निमित्त बाचणी येथे दिंडी सोहळा उत्साहात
बिद्री :
श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… विठ्ठल विठ्ठल जरी हरी विठ्ठल… असा टाळ-मृदंगाच्या नाम गजरात बाचणी (ता. कागल) येथे आषाढी एकादशी निमित्त गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.
आषाढी एकादशी निमित्त गावातील श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल- रखुमाईची आकर्षक पूजा मांडण्यात आली होती. दिंडीत सजविलेल्या रथात, टॅक्टरमध्ये श्री विठ्ठल-रुखमाई तसेच संताची वेशभूषा केलेली मुले दिंडीचे आकर्षण होते. टाळ- मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, आषर्षक फुगड्या यामुळे भक्तीमय वातावरण भारून गेले होते. माऊली भजनी मंडळ, न्यू हायस्कूल, दिशा ॲकॅडमी मुले-मुली, शिक्षक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी गावातील चौक व मार्गावर उभा व आडवा रिंगण सोहळा पार पडला. पाऊस असून ही नागरिकांचा उत्साहात कमी नव्हता.
दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी
दिंडीला भेट दिली. मुख्य चौकात कांही काळ गळ्यात विना घेत सहभागी झाले होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दिंडी मार्गावर ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी तसेच विविध मंडळे, ग्रामस्थ यांच्यावतीने दिंडीतील नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले. दिंडीची सांगता श्री विठ्ठल मंदिरात करण्यात आली.
— —