कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ दिंडीत झाले सहभागी
– वेळापूर येथे घेतले पालखीचे दर्शन.
कागल : व्हिजन प्रतिनिधी
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे वेळापूर (ता. माळशिरस) येथील दिंडीत सहभागी झाले होते. येथे पालखीचे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ यांनी खांद्यावर भगवी पताका घेऊन हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते.
यावेळी त्यांनी वारकरी व भाविकांशी संवाद साधला. त्यांनी विठूरायाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेला सुखी- समृद्ध व ठेवण्याची व पाऊसमान चांगले राखण्याची प्रार्थना केली. श्री मुश्रीफ यांच्या समवेत गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, ‘बिद्री ‘ चे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे अध्यक्ष उमेश भोईटे, माजी उपनगराध्यक्ष नवल बोते, नितीन दिंडे, सौरभ पाटील आदी उपस्थि होते.
— — –