मुख्याध्यापक आवेलिन देसा यांच्या निरपेक्ष वृत्तीमुळेच समाजात वेगळा ठसा
– बाचणी येथे सेवानिवृत्ती सत्कार समारंभात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे गौरवोध्दार
बाचणी : ( व्हिजन प्रतिनिधी )
बाचणी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आवेलिन देसा हे निरपेक्ष वृत्तीने काम करीत आहेत. त्यांच्या निस्वार्थीपणामुळेच आमच्यासह सर्वांचे प्रेम आहे. ते स्वतः विस्थापित असून ही समाजाबद्दलची तळमळ त्यांच्या अंगी आहे.
त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा निर्माण केला आहे. असे प्रतिपादन अन्नपूर्णा शुगरचे चेअरमन व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
कागल तालुक्यातील विद्या मंदिर बाचणी शाळेचे मुख्याध्यापक आवेलिन देसा यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या सदिच्छा सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी सारथी पुणेचे कार्यकारी अधिकारी विलास पाटील, कागल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रारंभी श्री देसा यांच्या जीवन कार्यावर लेखक प्रकाश सोनाळकर यांच्या लेखनावर आधारित चित्रफित प्रसारित करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक देसा व त्यांच्या पत्नी वायलेन देसा यांचा सहपत्नीक सत्कार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. बाचणीच्या ग्रामस्थ शिक्षकांच्यावतीने मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
सारथीचे कार्यकारी अधिकारी विलास पाटील यांनी श्री देसा यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाले, जीवनात संघर्ष करून त्यांनी कतृत्व सिद्ध केले आहे. त्यांची सेवा निवृत्ती झाली नाही. तर सेवा पूर्ती झाली आहे. एका सर्वसामान्य शिक्षकाने केलेले काम इतराना आदर्शवत आहे. अंगण व रणांगण या दोन्ही क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे त्यांचे कर्तृत्व यशस्वी झाले आहे.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक श्री देसा म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी मुळात अंगात धाडस हवे. त्यामुळे माणासात नेतृत्व गुण येतात. माझ्या या यशस्वी जीवनात माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळचे संचालक अबंरिषसिंह घाटगे यांचा मोलाचा वाटा आहे. शाळा उभारणीत अंबरिषसिंह
घाटगे यांनी जिल्हा परिषद फंडातून साडेसतरा लाख रुपये दिले. एम्पथी फांऊडेशन व गावकऱ्यांच्या पाठींब्यामुळे सव्वा कोटीची दिमाखदार इमारत उभी राहिली आहे.
यावेळी गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच विशाल पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा प्रज्ञा पाटील, केंद्रप्रमुख तानाजी आसबे, कर्मचारी पत संस्थेचे संचालक सुनील पाटील, ग्रामसेवक सागर पार्टे, बाळासो तांबेकर, अजित पाटील, सुनील पोवार यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक नानासो कांबळे, आर. एस. गावडे, वसंत कुंभार, शिवाजी हातकर, अल्लाबक्ष शहाणेदिवाण, बाळासो खामकर, रवि पाटील, नेताजी कमळकर, प्रकाश मगदूम, संजय दाभाडे, राजाराम सावर्डेकर , तुकाराम इंगवले आनंदा कांबळे, महादेव गुरव, एल. डी. पाटील, डी. ए. वस्ताद, संदीप पाटील यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळा समितीचे सर्व सदस्य, बाचणी शाळेचा सर्व स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत सुरेश सोनगेकर यांनी केले. प्रास्ताविक एस. के. पाटील यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक के. एस. बारड यांनी मानले.
— —