वाळवे खुर्द येथे वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करून महिलांनी दिला सामाजिक संदेश
– बिद्री, बाचणी परिसरात वटपोर्णिमा उत्साहात
बिद्री : प्रतिनिधी
वटपोर्णिमेच्या निमित्ताने सुहासिनीनी महिलांनी वाळवे खुर्द (ता. कागल) वडाच्या झाडांचे मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून औक्षण केले. केवळ वडाची पूजा न करता येथील महिलांनी वेगळा संदेश दिला आहे.
बिद्री, बाचणी परिसरात वटपोर्णिमा सण उत्साहाने साजरा झाला. वाळवे खुर्द येथील महिला एकत्र येत मोकळ्या जागेत जादा आयुष्यमान असणारी वड व पिंपळ या झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी संभाजी ब्रिग्रेडचे बाळासाहेब पाटील यांनी या झाडाबद्दल महत्व विषद करून मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सरपंच संगीता बोडके, माजी सरपंच आरती पाटील, आनंदी आसबे, संगीता पाटील, कल्पना पाटील सुनंदा पाटील, शांताबाई पाटील, संजीवनी आळवेकर निशाआसबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. येथील महिलांनी वेगळा सामाजिक संदेश दिला आहे.
सुहासिनीनींची सकाळपासून लगबग सुरू होती. उपवास करून हिरवी साडी, हिरवा चुडा, खास ठेवणीतील दागिने असा सर्व साजशृंगार करण्यात आला होता. वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. वडाला सात फेर्या घालत दोरा गुंडाळला. महिलांनी एममेकींची ओटी भरून हळदी- कुंकवाचे औक्षण केले. प्रसाद म्हणून केळी, आंबे वाटण्यात आले. घरी येवून पतीचे औक्षण करून आशीर्वाद घेतला. यामुळे महिलांमध्ये एक वेगळा उत्साह जाणवत होता.
– –